सीसीसी (CCC) कोर्स ची संपूर्ण माहिती | CCC Course Information in Marathi
सीसीसी (CCC) कोर्स ची संपूर्ण माहिती | CCC Course Information in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सीसीसी (CCC) कोर्स या विषयावर माहिती बघणार आहोत. संगणक संकल्पनांचा अभ्यासक्रम (CCC) हा एक प्रमाणपत्र कार्यक्रम आहे जो व्यक्तींना आवश्यक संगणक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
CCC चे पूर्ण रूप म्हणजे Course on Computer Concepts. हा कोर्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) द्वारे ऑफर केला जातो, जो भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.
CCC Course अभ्यासक्रम (CCC Course Syllabus)
CCC Course चा अभ्यासक्रम खाली दिलेला आहे-
- Introduction To Computer
- Introduction to Operating System
- Word Processing
- Spreadsheet
- Presentation
- Introduction to Internet and WWW
- E-mail, Social Networking, and e-Governance Services
- Digital Financial Tools and Applications
- Overview of Future Skills & Security
CCC Course करण्याचे चे फायदे (Advantages Of CCC Course)
आपल्यापैकी ज्यांना कुणाला कॉम्पुटर शिकायचे असेल त्यांनी हा कोर्स करायलाच हवा. या कोर्स च्या माध्यमातून कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान दिले जाते जे प्रत्येकाला शिकणे गरजेचे आहे. CCC कोर्स केल्याचे काही महत्त्वाचे फायदे खालीलप्रमाणे –
- CCC कोर्स केल्यानंतर तुम्हाला संगणकाचे बेसिक ज्ञान मिळते आणि तुम्ही संगणक चालवायला शिकता.
- CCC कोर्स हा सरकार कडून मान्यताप्राप्त असल्याने तुम्ही सरकारी नोकरीसाठी CCC कोर्स च्या Certificate चा वापर करू शकता.
- आपण जर विद्यार्थी असाल तर हा कोर्स करून चांगल्याप्रकारे संगणक वापरायला शिकू शकता आणि अभ्यासासाठी संगणक वापरू शकता.
- CCC कोर्स केल्याने आपले अनेक कामे सोपी होतील कारण संगणकाचे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात खूप आहेत.



Comments
Post a Comment